भाजपने कंबर कसली, बारामतीत घड्याळ तर साकोलीत पंजा थांबवण्याचा कार्यकर्त्यांना बानवकुळेंच आव्हान
वरळीच्या समुद्रात मशाल विझवायची असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी केलं आहे. तसेच तर बारामतीत घड्याळ आणि साकोलीत पंजा थाबवायचाय असेहीते म्हणाले.
राज्यात सत्तेची समिकरणं बदलली आहे राज ठाकरे आणि शिंदे गट आणि भाजपच्या गाठी-भेटी वाढल्या आहेत. अंधेरी पोटनिवडणूक आणि सध्याची राज्यातील राजकीय स्थितीवर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे 20 मिनिटं स्वतंत्रन चर्चा झाली. अंधेरी पोटनिवडणूकीच्या प्रचाराला सुरूवात झाली आहे. मात्र आधीच भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांच्या उमेदवारी विरोधात उद्धव ठाकरे गट न्यायालयात जाणार आहे. ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरूवात झाली आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके हातात मशाल घेऊन त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. तर वरळीच्या समुद्रात मशाल विझवायची असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी केलं आहे. तसेच तर बारामतीत घड्याळ आणि साकोलीत पंजा थाबवायचाय असेहीते म्हणाले.
