Solapur Aaji- Ajoba Voting | तरुणांनाही लाजवेल असा उत्साह… 92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान

Solapur Aaji- Ajoba Voting | तरुणांनाही लाजवेल असा उत्साह… 92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान

| Updated on: Feb 07, 2026 | 2:02 PM

सोलापूरमधील करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. सकाळपासूनच नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत आहेत. 2 वर्षीय कृष्णनाथ आंबेकर यांनी आपल्या 90 वर्षीय पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला.

सोलापूरमधील करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जोरात सुरू आहेत. सकाळपासूनच नागरिक मोठ्या उत्साहाने मतदानाचा हक्क बजावत आहेत. तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेच नागरिक आपल्या मताचा उपयोग करण्यासाठी घराबाहेर पडलेले दिसत आहेत. करमाळा तालुक्यातील केम येथील मतदान केंद्रावर मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे. मतदार आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून मतदान करीत आहेत. या ठिकाणी मतदान करताना अनेक वयोवृद्ध मतदारही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

दरम्यान, 92 वर्षीय कृष्णनाथ आंबेकर यांनी आपल्या 90 वर्षीय पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी मतदान करताना मीडिया समोर आत्मविश्वास व्यक्त करत म्हटले की, “आम्ही जोडीने मतदान करत आहोत आणि 100 व्या वर्षी देखील एकत्र मतदान करू.” मतदार कृष्णनाथ आंबेकर यांनी सांगितले की, “लोकशाही ही प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे आणि मतदान हा त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. आपण आपल्या मताचा योग्य वापर केला पाहिजे.”

Published on: Feb 07, 2026 02:02 PM