यात काही धक्का बसला असं नाही, कारण… सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई…

यात काही धक्का बसला असं नाही, कारण… सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई…

| Updated on: Jun 30, 2026 | 3:17 PM

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली.

राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून सचिन अहिर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी अर्ज भरला.

या घटनेचा ठाकरे गटाला खूप मोठा धक्का बसला असावा असं सांगितलं जात आहे. आठवड्याभरातच शिंदेंकडून उबाठा ठाकरे गटाला हा दुसार मोठा धक्का आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या प्रकरणावर आता वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, हा काही मोठा धक्का नाही, वरळी ही आधीपासून शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे आणि राहिल. कोणत्या एखाद्या व्यक्तिच्या येण्या-जाण्याने वरळी आमच्या हातातून जात नाही. हे सर्व लोकं लोभापोटी गेले आहेत. वरळी नेते सचिन आहिर यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशाच्या चर्चांबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसलं. त्यांनी योग्य ती कारवाई करू असं देखील सांगितलं आहे.

Published on: Jun 30, 2026 2:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us