रात्रभर झोप नव्हती… अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया

रात्रभर झोप नव्हती… अखेर मुलाच्या कष्टाचं चीज झालं; प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या आईची भावनिक प्रतिक्रिया

| Updated on: Jul 25, 2026 | 4:16 PM

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने लावून धरणाऱ्या आंदोलनकर्त्यांपैकी अभिजीत दीपके यांच्या आंदोलनालाही मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांच्या आई अनिता दीपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

टीव्ही नाईनशी बोलताना अनिता दीपके म्हणाल्या, “रात्रभर आम्हाला झोप लागत नव्हती. अनेकदा रात्री तीन वाजेपर्यंत जागे राहून मुलाचं काय होईल, याची चिंता सतावत होती. गेल्या अडीच महिन्यांपासून त्याला झोप नव्हती. अखेर त्याच्या कष्टाचे चीज झाले असून आता समाधान वाटत आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, “अभिजीत ६ जून रोजी बोस्टनहून भारतात आला आणि तेव्हापासून आंदोलनात सक्रिय सहभागी झाला. गेल्या अडीच महिन्यांपासून त्याने सातत्याने संघर्ष केला. आता या आंदोलनाला यश मिळाल्याने आम्हाला खूप बरं वाटत आहे.”

दरम्यान, आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर झालेल्या लाठीमारानंतर अनिता दीपके यांनी तीव्र चिंता व्यक्त केली होती. “त्याला अटक झाली तर आंदोलन वेगळ्या वळणावर जाईल. आम्हाला लाठीचार्जची भीती वाटत आहे. सरकारने लवकरात लवकर या प्रश्नावर तोडगा काढावा,” अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती.

आता केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दीपके यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत, हा विद्यार्थ्यांच्या संघर्षाचा आणि सातत्यपूर्ण आंदोलनाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली आहे.

Published on: Jul 25, 2026 4:15 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us