Aaditya Thackeray यांना केंद्रीय पर्यावरण विभागाचा धक्का-tv9

| Updated on: Aug 17, 2022 | 9:49 AM

केंद्रीय पर्यावरण विभागाने आदित्य ठाकरे यांना धक्का देताना दिलेल्या भूखंड वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Follow us on

मुंबई : मुंबईत तिरुपती बालाजीचे भव्य मंदिर उभारण्यासाठी जी जागा देण्यात आली होती त्यावरून आता माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने आदित्य ठाकरे यांना धक्का देताना दिलेल्या भूखंड वाटपाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आदित्य ठाकरे हे पर्यावरणमंत्री असताना तिरुपती बालाजी संस्थानला मुंबईत 10 एकर जागा देण्यात आली होती. त्याचीच चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच CRZ1 प्रकारातला भूखंड देवस्थानला देऊन फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. यासंदर्भात नेट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन.कुमार यांनी तक्रार केली होती.