Thackeray Brothers : ठाकरे बंधू आता भिडणार… 18 वर्षांनंतर राज अन् उद्धव एकाच मंचावर, अशी झाली एन्ट्री
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा वरळी डोम येथे पार पडला. यावेळी दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित पाहून अनेकांचे डोळे पाणावले तर काहीनी इच्छा पूर्ण झाली अशी भावना व्यक्त केली.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरून असंख्य मराठी माणूस आज एकवटल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे बंधूंचा आज विजयी मुंबईतील वरळी डोम येथे पार पडला. गेल्या काही दिवसांपासू राज्यात हिंदीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं होतं. पहिलीपासून हिंदीची सक्ती नको अशी भूमिका अनेक पक्षांनी आणि संघटनांनी घेतली होती. याच पार्श्वभूमीवर पाच जुलै म्हणजे आज याविरोधात भव्य असा मोर्चा निघणार होता, मात्र सरकारने जीआर रद्द केला. परिणामी ठाकरे बंधूंचा मोर्चाही रद्द झाला. दरम्यान, मोर्चा रद्द झाला तर मराठी माणसाच्या एकजुटीचा विजय झाला म्हणून ठाकरे बंधूंकडून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. तब्बल 18 वर्षांनंतर राज अन् उद्धव एकाच मंचावर दिसणार म्हणून कित्येक शिवसैनिक हा क्षण पाहण्यासाठी उपस्थित होते. बघा कशी झाली एन्ट्री…
Published on: Jul 05, 2025 01:33 PM
