Sanjay Raut | पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
राज्यभरात अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर्स लावून दादांना श्रद्धांजली दिली जात आहे. भाजपनेही वर्तमानपत्रात जाहिरात देत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपने अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. दादा यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आज दादांच्या पार्थिवावर बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते उपस्थित होते. राज्यभरात अजितदादांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ठिकठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर्स लावून दादांना श्रद्धांजली दिली जात आहे. भाजपनेही वर्तमानपत्रात जाहिरात देत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
त्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपने अजित दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पानभर जाहिराती दिल्या, त्यानं काय होणार? अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी केलेले 70 हजार कोटींचे आरोप मागे घ्यावे, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे.
