Breaking | गुलाबनंतर महाराष्ट्राला शाहीन चक्रीवादळाचा धोका

| Updated on: Sep 29, 2021 | 8:38 AM

गुलाबनंतर महाराष्ट्राला शाहीन चक्रीवादळाचा धोका. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाड्यात झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Follow us on

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नाशिक शहराला महापुराचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसाने नाशिकच्या ग्रामीण भागात अक्षरशः हैदोस घातला असून सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मनमाड, नांदगाव, मालेगाव, चांदवड, सटाणा, देवळा भागातील सर्वच नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.