महायुतीच्या समन्वय बैठकीत एकमेकांवर संशयकल्लोळ? समीकरणं जुळली पण मनं जुळणार का?

महायुतीच्या समन्वय बैठकीत एकमेकांवर संशयकल्लोळ? समीकरणं जुळली पण मनं जुळणार का?

| Updated on: Jan 16, 2024 | 1:11 PM

जळगाव, यवतमाळ, बीड, अमरावती, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महायुतीच्या बैठका आणि कार्यक्रम झाले. मात्र यासर्व जागांवर आपापले दावे, कोणामुळे कोण सत्तेत असल्याच्या विधानांनी हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. एकमेकांवरूद्ध लढलेले दिग्गज एकाच मंचावर आल्यानंतर कोणत्या नेत्यांच्या वक्तव्यांनी कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला बघा

मुंबई, १६ जानेवारी २०२४ : महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका गटासोबत भाजपा महायुतीतून लढणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात एकमेकांविरूद्ध लढलेले काल एकाच मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. तर महायुतीत समन्वय साधणं या कार्यक्रमाचा उद्देश होता. मात्र यावेळी विधानांनी हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आलाय. तिघांची महायुती म्हणजे विकासाचा त्रिशुल असल्याचा दावा असला तरी महायुतीतील धुसफूस आणि नाराजी बाहेर पडली आहे. जळगाव, यवतमाळ, बीड, अमरावती, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महायुतीच्या बैठका आणि कार्यक्रम झाले. मात्र यासर्व जागांवर आपापले दावे, कोणामुळे कोण सत्तेत असल्याच्या विधानांनी हा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. एकमेकांवरूद्ध लढलेले दिग्गज एकाच मंचावर आल्यानंतर कोणत्या नेत्यांनी काय केले वक्तव्य बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jan 16, 2024 01:11 PM