आता कोकाटे म्हणतात सरकारच भिकारी आहे..

आता कोकाटे म्हणतात सरकारच भिकारी आहे..

| Updated on: Jul 22, 2025 | 11:34 AM

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली असून यावेळी पीकविमावर भाष्य केलं आहे.

शेतकऱ्यांना आम्ही एक रुपया देत नाही. आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो. म्हणजे भिकारी कोण शासन आहे, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना म्हंटलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासह रमी खेळतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर देखील भाष्य केलं.

यावेळी बोलताना कोकाटे पुढे म्हणाले की, माझ्या काळात बोगस अर्ज सापडले. मी तात्काळ रद्द केले. मी ५२ जीआर काढले. सर्वाधिक निर्णय घेतले. आतापर्यंत एकही कृषी मंत्री संशोधन केंद्रावर गेला नाही. मी गेलो. मी बांधावर गेलो. प्रत्येक गावात वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही माझी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत आहे. १०० दिवसाच्या कार्यक्रमात तिसरा क्रमांक कृषी विभागाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Published on: Jul 22, 2025 11:34 AM