Ahilyanagar : काँग्रेस जिल्हाध्यक्षाला बळबळ कारमध्ये कोंबलं.. काही बोलायच्या आतच… अपहरण केलं अन्… बघा CCTV व्हिडीओ
अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप आहे
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अहिल्यानगरमध्ये एका बड्या नेत्याच्या अपहरणानं एकच भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या बड्या नेत्याचं नुसतं अपहरणच केलं नाही तर त्याला जबर मारहाण देखील करण्यात आली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करण्यात आले असून त्याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि आमदार हेमंत ओगले यांच्यासह सचिन गुजर यांनी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे.
Published on: Nov 26, 2025 02:02 PM
