Ahilyanagar : आता मी मेल्यावर… आत्महत्येपूर्वी व्हिडीओ रेकॉर्ड अन् शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल? अहिल्यानगरात खळबळ
अहिल्या नगरच्या नेवासा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. शेतकरी बाळासाहेब सरदे यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी मोबाईलवर त्यांनी एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता आणि हा व्हिडिओ सरदे यांनी आधीच व्हायरल केला होता.
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. बाबासाहेब सरदे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. आत्महत्येपूर्वी बाबासाहेब सरदे यांनी एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. आज ना उद्या कर्जमाफी होईल ही आशा होती असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने या व्हिडीओमध्ये म्हटल्याचे पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी केली नाही असं बाबासाहेब सरदे यांनी व्हिडीओत म्हटलं. योग्य वेळी मदत झाली असती तर जगलो असतो पण आता आत्मविश्वास संपला आहे. कर्जबाजारी शेतकरी म्हणून पिळवणूक होतेय या जगात पैशांशिवाय काहीच होत नाही. जीवंतपणी मदत झाली नाही मी मेल्यावर इतर शेतकऱ्यांना तरी मदत करा, असं आवाहन या शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय.
Published on: Aug 22, 2025 05:21 PM
