Dhananjay Munde Video : ‘सध्या मी टार्गेटवर, मी दोषी आहे…’, धनंजय मुंडे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का?

Dhananjay Munde Video : ‘सध्या मी टार्गेटवर, मी दोषी आहे…’, धनंजय मुंडे नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा देणार का?

| Updated on: Jan 29, 2025 | 3:40 PM

Dhananjay Munde Reaction On Resign : नुकतीच अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेत काही पुरावे सादर करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह महायुती सरकारवर त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. नुकतीच अंजली दमानिया यांनी अजित पवार यांची भेट घेत काही पुरावे सादर करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दमानिया आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार होते. यादरम्यान त्यांच्या राजीनाम्याचा फैसला होणार अशी चर्चा रंगली होती. तर मुंडे यांनी याविषयी आक्रमक बाजू मांडली. ते म्हणाले, ‘माझी नैतिकता माझ्या लोकांच्या बद्दल प्रामाणिक आहे. जी गोष्ट घडलीय. त्याबाबत मी जे बोललो ते प्रामाणिक बोललो. मी नैतिकतेत दोषी आहे असं मला वाटत नाही. माझा दोष माझ्या वरिष्ठांनी सांगावं लागेल’, असं मंत्री धनंजय मुंडे म्हणाले. माध्यमांनी राजीनाम्याच्या मागणीवर केलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर देताना थेट प्रतिक्रिया दिली. पुढे ते असेही म्हणाले, पालकमंत्री म्हणून अजित पवार बीडला पहिल्यांदाच येत आहे. ते जेव्हा जेव्हा आले तेव्हा त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं. उद्या पहिलीच मिटिंग आहे. डीपीडीसीची बैठक आहे. त्यामुळे फारशी तयारी नाही. अभूतपूर्व स्वागत केल्यावर उद्या काय बातम्या येईल हे मला माहित आहे. त्यामुळे मी फारशी तयारी केली नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले.

Published on: Jan 29, 2025 03:33 PM