Malegaon Sakhar Karkhana : माळेगावचा कारभारी कोण होणार? कधी लागणार निकाल?

Malegaon Sakhar Karkhana : माळेगावचा कारभारी कोण होणार? कधी लागणार निकाल?

| Updated on: Jun 25, 2025 | 8:58 AM

Malegaon Sakhar Karkhana Election Result : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतांची मोजणी कालपासून सुरू आहे. यात सत्ता कोणाच्या हाती येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

अजित पवार माळेगाव कारखान्यावर सत्ता कायम ठेवणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने पहिल्या फेरीत लक्षणीय आघाडी घेतली आहे. मध्यरात्री दीड वाजता पूर्ण झालेल्या पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतर अजित पवार गटाचे १७ उमेदवार आघाडीवर आहेत. तर चंद्रराव तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवारही आघाडीवर आहेत.

मतमोजणीच्या पहिल्याच टप्प्यात ‘ब वर्ग’ गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. त्यांच्या पॅनलची विजयी सुरुवात पाहायला मिळाली. या निवडणुकीतील मतमोजणीच्या पहिल्या फेरीच्या मोजणीत निळकंठेश्वर पॅनलचे १६ उमेदवार आघाडीवर होते. दरम्यान, दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे साडेपाच वाजता सुरू झाल्याने अंतिम निकाल दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत अपेक्षित आहे.

Published on: Jun 25, 2025 08:58 AM