Malegaon Sakhar Karkhana : माळेगाव कारखाना अजितदादांच्या ताब्यात

Malegaon Sakhar Karkhana : माळेगाव कारखाना अजितदादांच्या ताब्यात

| Updated on: Jun 26, 2025 | 12:37 PM

Malegaon Sakhar Karkhana Result : 21 पैकी 20 उमेदवार जिंकून अजितदादांच्या पॅनलने ही बाजी मारली आहे. त्यामुळे माळेगाव कारखाना आता अजित पवारांच्या ताब्यात आला आहे.

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांच्या गटाने मोठी बाजी मारली आहे. 21 पैकी 20 उमेदवार जिंकून अजितदादांच्या पॅनलने ही बाजी मारली आहे. त्यामुळे माळेगाव कारखाना आता अजित पवारांच्या ताब्यात आला आहे. या कारखाना निवडणुकीत अजित पवार स्वत: निवडून आले आहेत. 101 पैकी 91 मतं घेऊन अजितदादांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

बारामती तालुक्यातील प्रतिष्ठेची लढाई म्हणून पाहिल्या जाणाऱ्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीला निकाल बुधवारी जाहीर झाला. या निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सुरुवात झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलने २० जागा जिंकत नेतृत्वाचा करीश्मा सिध्द केला आहे. तर गुरुशिष्यांचा सहकार बचाव पॅनलला अवघ्या एका जागेवर समाधान मानाने लागले. यामध्ये ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे निवडुन आले, तर रंजन तावरे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच शरद पवार गटाला सभासदांना सपशेल नाकारले. या गटाला एकही जागा मिळालेली नाही.

Published on: Jun 26, 2025 12:33 PM