अजित पवार आणि विजय घाडगेंची भेट; बघा काय झाली चर्चा
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या मंगळवारपर्यंत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासंदर्भात निर्णय घेणार आहेत. छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी आज अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी घाडगे यांना याबाबत शब्द दिला आहे. तसेच, सूरज चव्हाण यांना पक्षात पुन्हा सामील करून घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
छावा संघटनेच्या विजय घाडगे यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणी येत्या मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. शिवाय, सूरज चव्हाण यांना पक्षात परत घेणार नसल्याचेही अजित पवार यांनी यावेळी नमूद केल्याचे घाडगे यांनी सांगितले.
Published on: Jul 25, 2025 04:32 PM
