Sharad Pawar | शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा तो दावा खोडला; काय म्हणाले?
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा आहे की, विलिनीकरण ठरले होते, तर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेत्यांचा याला विरोध आहे. मात्र यावर शरद पवार यांनी बोलताना म्हटले की, जे लोक या बैठकीत नव्हते, त्यांना याबद्दल कशी माहिती असणार?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात अकस्मात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठा बदल दिसून आला. अजित पवार यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यापूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या शपथविधीबाबत काहीच माहीत नसल्याचं म्हटलं होतं. अजित पवार यांच्या निधनाआधी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेला गती मिळाल्याचे समजत होते. मात्र, या चर्चेवर आता खंड पडला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असतं तर अजितदादांनी मला तसं सांगितलं असतं. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांचा हा दावा शरद पवार यांनी अनौपचारिकपणे बोलताना खोडला आहे. विलिनीकरणाच्या बैठकीत जे सहभागी नव्हते, त्यांना याबद्दल माहिती कशी असणार? असा सवाल शरद पवार यांनी केला आहे. या बैठकीत फक्त अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार सहभागी होते.
राजकीय वर्तुळात अजूनही दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत मतभेद कायम आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा आहे की, विलिनीकरण ठरले होते, तर अजित पवार गटाचे वरिष्ठ नेत्यांचा याला विरोध आहे. मात्र यावर शरद पवार यांनी बोलताना म्हटले की, जे लोक या बैठकीत नव्हते, त्यांना याबद्दल कशी माहिती असणार?
