Akola : इतिहास जमीनदोस्त… अन् पाहता क्षणी हजारो वर्ष जुना ऐतिहासिक किल्याचा बुरूज कोसळला

Akola : इतिहास जमीनदोस्त… अन् पाहता क्षणी हजारो वर्ष जुना ऐतिहासिक किल्याचा बुरूज कोसळला

| Updated on: Jul 24, 2025 | 5:38 PM

अकोल्यातील बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचे एक बुरुज कोसळल्याची घटना आज सकाळी घडली. पावसामुळे शेकडो वर्ष जुन्या असलेल्या ऐतिहासिक किल्ल्याचा बुरुज कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.

अकोल्याच्या बाळापूर येथील एका ऐतिहासिक किल्ल्याचा बुरूज कोसळला. हजारो वर्ष जुना असलेला किल्ला सर्व बाजूने पडण्याच्या मार्गावर आहे. याआधी देखील याच किल्ल्याचे दोन ठिकाणी बुरूज ढासळल्याची माहिती आहे. या किल्ल्याचे बुरुज आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. हजारो वर्ष जुन्या किल्ल्याचा बुरुज सततच्या पावसामुळे कोसळल्याची शंका व्यक्त केली जात आहे. अकोल्याच्या बाळापूर येथील एका ऐतिहासिक किल्याच्या दोन्ही बाजूने जुने शहर आणि कासारखेड तसेच गाजीपूर तहसीलकडे जाण्याचा मार्ग असून या किल्ल्याला लोखंडी बॅरिकेट्सचे कंपाऊंड असल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोणतीही दुर्घटना झाली नसली तरी मात्र स्थानिक नागरिकांनी पुरातत्व विभागाने या किल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी केली आहे. बघा ऐतिहासिक किल्ल्याचा बुरूज कसा कोसळला?

Published on: Jul 24, 2025 05:38 PM