James Comey : 8647 कोड अन् ट्रम्प यांच्या हत्येच्या कट… ज्याच्यावर संशय तो म्हणतो मला कल्पनाच नव्हती की…

James Comey : 8647 कोड अन् ट्रम्प यांच्या हत्येच्या कट… ज्याच्यावर संशय तो म्हणतो मला कल्पनाच नव्हती की…

| Updated on: May 16, 2025 | 3:24 PM

ट्रम्प यांना मारण्यासाठी कोड 8647 जारी करण्यात आलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या आतत्याचा कट उघड झालाय. अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिसेस आणि एफबीआयकडून यासंदर्भातला तपास सुरू आहे. एफबीआयच्या एका माजी संचालकाने कट रचल्याचा संशय आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्यासाठी ‘कोड 8647’ जारी करण्यात आला होता. अमेरिकेची सिक्रेट सर्व्हीस आणि एफबीआयकडून तपास सुरू करण्यात आला आहे. अशातच एफबीआयचे माजी संचालक जेम्स कोमी यांना यासाठी जबाबदार धरलं पाहिजे आणि तुरुंगात टाकलं पाहिजे. माजी एफबीआय संचालकांनी अनेक गुंडांवर खटला चालवला आहे, ते गुंड काय करू शकतात हे त्यांना माहिती आहे. ट्रम्प यांच्यावर आधीही दोनदा प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या जीवाला कोमी यांनी दिलेल्या धमक्याच्या चौकशीला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो, असं अमेरिकेचे नॅशनल इंटेलिजन्स डायरेक्टर (राष्ट्रीय गुप्तचर संचालक) तुलसी गबार्ड यांनी म्हटलंय.

तर ट्रम्पच्या हत्येचा ज्याच्यावर संशय त्याने ट्वीट करत असं म्हटलं की, आज समुद्रकिनाऱ्यावर फिरताना पाहिलेल्या काही शंखांचा फोटो पोस्ट केला होता. मला वाटलं की तो एक राजकीय संदेश असावा. मला कल्पना नाही की काही लोक त्या आकड्यांचा संबंध हिंसाचारासही जोडतील. माझ्या मनात कधीच हे आलं नाही मात्र मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला विरोध करतो म्हणून मी पोस्ट काढून टाकली, असं एफबीआय माजी संचालक जेम्स कोमी यांनी म्हटलंय.

Published on: May 16, 2025 03:22 PM