Amit Thackeray : राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद… प्रकरण नेमकं काय?

Amit Thackeray : राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद… प्रकरण नेमकं काय?

| Updated on: Nov 17, 2025 | 10:02 PM

नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवाना लोकार्पण केल्याप्रकरणी अमित ठाकरे आणि मनसे नेते गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चार महिन्यांपासून पुतळा अनावरणच्या प्रतीक्षेत होता. या घटनेनंतर अमित ठाकरेंनी अभिमान व्यक्त केला, तर आदित्य ठाकरे आणि मनसेने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवाना लोकार्पण केल्याप्रकरणी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरुळ पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता आणि कपड्याने झाकून ठेवण्यात आला होता. १६ तारखेला अमित ठाकरेंनी या पुतळ्याचे अनावरण केले होते.

गुन्हा दाखल झाल्यानंतर अमित ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुन्हा दाखल होणे हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सरकारवर महाराजांसाठी वेळ नसल्याची टीका केली. या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी या कृतीला “दडपशाही” असे संबोधले आणि महाराजांच्या सन्मानासाठी केलेल्या कृतीवर गुन्हा दाखल करण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मनसे नेते गजानन काळे यांनीही सरकारच्या भूमिकेवर टीका केली.

Published on: Nov 17, 2025 10:02 PM