Amit Thackeray | रस्त्यावर खड्डे असल्याने अमित ठाकरे मुंबई लोकलने कल्याण-डोंबिवलीला रवाना
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) दौऱ्यावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अमित ठाकरे हे लोकल रेल्वेने कल्याण डोंबिवलीकडे रवाना झाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) हे आज कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) दौऱ्यावर आहेत. महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अमित ठाकरे हे लोकल रेल्वेने कल्याण डोंबिवलीकडे रवाना झाले. दादर स्टेशनवरुन त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास लोकल पकडून, ते कल्याण डोंबिवलीला रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे हे सुद्धा होते.
राज्यभरात रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्याबाबत अमित ठाकरे यांनी नुकतीच एक पोस्ट लिहून सरकारवर हल्लाबोल केला होता. नाशिकमध्ये मनसेने चांगले रस्ते बांधले. रस्ते बांधणे हे रॉकेट सायन्स नाही. आम्ही 5 वर्षात नाशिकमध्ये चांगले रस्ते बांधले, तुम्ही 25 वर्षात का नाही बांधू शकत, असा सवाल अमित ठाकरे यांनी विचारला.
