Amravati : लग्नाच्या स्टेजवर हे काय घडलं? नवरा-नवरीला भेटण्यास पाहुण्याची गर्दी अन् ‘त्या’ दोघांनी काढला चाकू … थरारक Video ड्रोन कॅमेरात कैद
अमरावतीच्या बडनेरा येथील धक्कादायक घटना घडली. लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला कऱण्यात आल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. नवरदेव सुजलराम समुद्रेवर दोन युवकांचा चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचा थरारक व्हिडीओ ड्रोन कॅमेरात कैद झालाय.
अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजलराम समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजलराम समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ समोर आले आहे.
नवरदेव सुजलराम हा जखमी झाल्यावर, नववधू हीच त्या ठिकाणी चक्कर येऊन पडली, नवरदेवाचे वडील आरोपींना पकडायला गेले असता त्यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न आरोपी कडून करण्यात आला. आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेल्याचा संपूर्ण व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली.
Published on: Nov 12, 2025 01:29 PM