Amravati | रस्त्यावरील गोवंशाची इनोव्हा गाडीतून तस्करी, प्रकार सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Sep 30, 2021 | 5:09 PM

अनेकदा मोठ्या जळ वाहनातून गोवंशाची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्यात. मात्र चक्क रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची  इनोव्हा गाडीतून तस्करी होत असल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे  समोर आली आहे.

Follow us on
अनेकदा मोठ्या जळ वाहनातून गोवंशाची तस्करी होत असल्याच्या अनेक घटना पुढे आल्यात. मात्र चक्क रस्त्यावरील मोकाट असलेल्या जनावरांची  इनोव्हा गाडीतून तस्करी होत असल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे  समोर आली आहे.धामणगाव रेल्वेतील शिवाजी चौकात 27 सप्टेंबर रोजी रात्री 1 वाजता रस्त्यावरील मोकाट जनावरे असताना एका इनोव्हा गाडीतून 3 माणस उतरली. आणि जनावरांना इंजेक्शन लावून त्यांना इनोव्हा गाडीत कोंबून नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस झालं आहे. त्यानंतर लगेच हीच इनोव्हा गाडी रात्री 1 वाजून 18 मिनिटांनी परत येऊन शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जनावरांना गाडीत कोंबून टाकत नेत असल्याची घटना सुद्धा कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इतकंच नाही तर 2 मिनिटांनी पेट्रोलिंग करणारी पोलिसांची गाडी मागेच आली आहे. हा सगळा प्रकार रात्री 1  वाजता ते 1 वाजून 29 मिनिटांपर्यंत झालाय.मात्र पोलिसांना या घटनेविषयी काहीही माहिती नसल्याच पोलीस सांगताहेत.त्यामुळे येथे नक्कीच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.धामणगाव परिसरात जनावरे पळविणारी टोळी सक्रिय असल्याने परिसरातील नागरिकांनी वेळीच सावध होणे मात्र गरजेचे आहे.