Governor Koshyari : 25 वर्षांनंतरचा अमृत काळ बघू शकणार नाही, राज्यपाल कोश्यारी यांचं वक्तव्य

| Updated on: Aug 15, 2022 | 8:05 PM

आज घरोघरी तिरंगा दिसत आहे. तिरंगा ही राष्ट्राची आत्मा आहे. लोकांना उत्साह आला आहे, तो दिसून आला असल्याचंही कोश्यारी म्हणाले.

Follow us on

पुणे : 25 वर्षांनंतरचा अमृत काळ बघू शकणार नाही, असं वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी पुण्यात केलं. त्यांनी सांगितलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गावातील पैसे सरळ सरपंचांच्या खात्यात जाईल. मग, जिल्हा परिषद, आमदार म्हणतात. आम्ही काय करणार. कोणत्याही कामात उशीर होत होता. भ्रष्टाचार बंद व्हावा, यासाठी सरपंचांना ताकद दिली जात आहे, असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुण्यात सांगितलं. देशात नवी जागृती आली आहे. पंतप्रधान म्हणाले, लसीकरण करा. त्यानंतर लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले. आता बुस्टर लसीकरण केलं जात आहे. आज घरोघरी तिरंगा दिसत आहे. तिरंगा ही राष्ट्राची आत्मा आहे. लोकांना उत्साह आला आहे, तो दिसून आला असल्याचंही कोश्यारी म्हणाले. देशभरात राष्ट्रीय महामार्ग नितीन गडकरी यांनी सुरू केलेत. सगळ्यांच्या सहकार्यानं हे यश मिळेल.