देवेंद्र फडणवीसांच्या 14 ट्विटनंतर हिंदू महासभेचे आनंद दवे यांचे भाजपाला 17 प्रश्न

| Updated on: Apr 15, 2022 | 5:04 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) 14 ट्विटनंतर हिंदू महासंघाने (Hindu Mahasabha) फडणवीसांना 15 प्रश्न विचारले आहेत. राज्यात मराठा आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे पाप हे भाजपा सरकारने केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. बाबासाहेब […]

Follow us on

भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) 14 ट्विटनंतर हिंदू महासंघाने (Hindu Mahasabha) फडणवीसांना 15 प्रश्न विचारले आहेत. राज्यात मराठा आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याचे पाप हे भाजपा सरकारने केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविरोधात हिंसेची भाषा वापरणाऱ्या किती जणांवर कारवाई करण्यात आली, यासह 15 प्रश्नांची उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यावी, असे आवाहन हिंदू महासभेकडून करण्यात आले आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर हा वाद राज्यात सुरू झाला. राज ठाकरेंनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती. तर राष्ट्रवादीकडून पलटवार करण्यात आला होता. यावेळी जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे आदी विषय पुन्हा काढण्यात आले. यावरच हिंदू महासभेने टीका केली आहे.