Siddhivinayak Temple Mumbai | अंगारकीनिमित्त सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी

Siddhivinayak Temple Mumbai | अंगारकीनिमित्त सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी

| Updated on: Jan 06, 2026 | 11:39 AM

नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थी निमित्त मुंबईकरांनी सिध्दीविनायकाच्या दर्शनासाठी सकाळीपासून गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. अंगारकी चतुर्थी निमित्त बाप्पासह मंदिर परिसर आकर्षक फुलांनी सजल्याचे पाहायला मिळाले होते. आज पहाटे पासून मु्ंबईकरांनी बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावून बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीनिमित्त पुणे आणि मुंबईतील गणेश मंदिरांमध्ये भाविकांची अलोट गर्दी दिसून आली. हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याने, पहाटेपासूनच हजारो भाविकांनी पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पांच्या मूर्तीला आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती, ज्यामुळे मंदिराला विशेष शोभा आली होती. भाविकांची वाढती संख्या आणि सुरक्षितता लक्षात घेता, मंदिरांच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी गर्दीचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने केले होते, जेणेकरून भाविकांना सुलभपणे दर्शन घेता आले. सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शन रांगेतून आमच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेतले. अंगारकी चतुर्थीचा हा शुभ दिवस साजरा करण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

Published on: Jan 06, 2026 11:39 AM