Anjali Damania Video : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अंजली दमानियांकडून थेट इशारा, ‘चार दिवस वाट पाहिन नंतर माझे….’
धनंजय मुंडे यांच्यासंदर्भातील काही कागदपत्रे दमानियांनी अजित पवारांना सादर केलेत आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. या कागदपत्रांमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबंधाबाबत माहिती असल्याचे समजतेय.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्यासंदर्भातील काही कागदपत्रे अजित पवारांना सादर केलेत आणि मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. या कागदपत्रांमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या आर्थिक संबंधाबाबत माहिती असल्याचे समजतेय. दरम्यान, आज अंजली दमानियांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधला असता आपण फक्त चार दिवसच थांबणार असल्याचे म्हटले आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘मी दिलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी चार दिवस पुरेसे आहेत. चार दिवस वाट पाहीन नंतर माझे कागदपत्र कोर्टासमोर ठेवेन’, असं म्हणत अंजली दमानिया यांनी थेट आव्हानच दिलं आहे. तर दोषी आहे म्हणूनच कारवाईची मागणी करत आहे, असंही अंजली दमानिया यांनी म्हटलंय. ‘राजीनामा न मिळण्याचे संकेत मिळत असेल तर त्यावर पुढे नंतर बघू पण सध्या मी अजित पवारांना पुरावे दिलेत त्यांनी ते मान्य केलेत. त्या पुराव्यांची सत्यता पडताळणी करायची असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पुराव्यांचे कागदपत्र दिलेत ते मी ऑनलाईन मिळवले आहेत. ते घरी छापलेले नाहीत. पण तरीही ते कागदपत्र खरे की खोटे हे तपासण्यासाठी त्यांना चार दिवस पुरेसे आहेत. जर चार दिवसांत त्यांनी ते केले नाही तर मी सर्व पुराव्यांचे कागदपत्र कोर्टापुढे सादर करणार आहे.’, असं अंजली दमानिया म्हणाल्यात.
