जुनेद मोहम्मद प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून आणखी एकाला अटक

| Updated on: Jun 02, 2022 | 4:10 PM

जुनेद मोहम्मद प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अतिरेकी संघटनेकडून टेरर फंडिंगच्या आरोपाखाली पुण्यातनं एका आरोपीला अटक करण्यात आली होती.

Follow us on

जुनेद मोहम्मद प्रकरणात महाराष्ट्र एटीएसकडून आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अतिरेकी संघटनेकडून टेरर फंडिंगच्या आरोपाखाली पुण्यातनं एका आरोपीला अटक करण्यात आली होती. या प्रकरणीच आता महाराष्ट्र एटीएसने आता जम्मू काश्मीरमधल्या किष्टवाडमधून आणखी एकाला अटक केली आहे. दहशतवादविरोधी पथकाकडून (Anti Terrorism Squad) जुनेद मोहम्मद या तरुणाला दापोडी परिसरातून अटक करण्यात आली होती. काश्मीरमधील अतिरेकी संघटनेकडून फंडिंग झाल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पुणे एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, गझवाते अल हिंद या काश्मीरमधील अतिरेकी संघटनेने (Terrorist organization) महिनाभरापूर्वीच या तरुणाच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो या संघटनेच्या संपर्कात आला होता.