Dhule : शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
गेल्या काही दिवसापासून वातावरणात जे बदल झालेत त्यामुळे मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. याचा फटका संपूर्ण राज्याला बसण्याची शक्यता आहे.
संपूर्ण धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कधी थंडी वाढते तर कधी धुकं वाढते तर कधी ऊन वाढतं, या अशा वातावरणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. शेतकऱ्याने लावलेल्या मक्याच्या पिकावर सध्या फवारणी सुरु आहे. गेल्या काही दिवसापासून वातावरणात जे बदल झालेत त्यामुळे मक्याच्या पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. याचा फटका संपूर्ण राज्याला बसण्याची शक्यता आहे, कारण अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याच्या उत्पादनात घट होण्याचे सांगिलते जाते. याचबरोबर हरभरा पिकावरही पण ह्या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनात सुद्धा घट होण्याची शक्यता आहे. पिकांच्या फवारणीवर खर्च होत असल्याने शेतकऱ्याने प्रशासनाकडे मदतीचा हात मागितला आहे. त्याचबरोबर हे वातावरण लवकरात लवकर निवळावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
