Breaking | राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर वानखेडे कुटुंबीयांच्या भेटीला

| Updated on: Oct 31, 2021 | 9:42 PM

आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर हे वानखेडे यांच्या घरी आले होते.

Follow us on

YouTube video player

मुंबई: सर, आमच्या कुटुंबाची बेइज्जती केली जात आहे. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न होत आहे. माझ्यावर दबाव आणला जात आहे. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी मागणी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी केली. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदर हे वानखेडे यांच्या घरी आले होते. यावेळी वानखेडे रोज होणाऱ्या आरोपांनी अत्यंत भडकलेले होते. वैतागलेले होते. त्यांच्या बोलण्यातून ते स्पष्टपणे जाणवत होते. संपूर्ण खानदान बोगस आहे, अशी भाषा मीडिया समोर करणं योग्य नाही. सर मी दलित समाजातून येतो. हे लोक माझी बेइज्जती करण्याचं काम करत आहेत. बोगसचा अर्थ काय होतो सर…? मला बेइज्जत केलं जात आहे. माझा युनिफॉर्म काढून घेणार, माझी नोकरी हिरावून घेणार… असं धमकावलं जात आहे. सर मला राष्ट्रपती नियुक्त करतात. जर मी काही चुकीचं काही केलं असेल तर राष्ट्रपती त्यावर न्याय करतील आणि तुम्ही न्याय कराल. रोज सकाळी 8 वाजता आणि 10 वाजता पत्रकार परिषद घेतली जात आहे. माझ्या कुटुंबाबत बोललं जात आहे. प्रायव्हेट गोष्टी सांगितल्या जात आहेत. आम्हाला टार्गेट केलं जात आहे. या गोष्टी बंद होत नाहीत. रोज मीडियाला बोलावून टीका केली जात आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझं तुम्हाला निवेदन आहे की कायद्याच्या चौकटीत राहून जे काही असेल त्याचं निवारण करा, अशी विनंतीच वानखेडे यांनी केली.