Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात उधळला बैल, वारकऱ्यांची धावपळ अन्… बघा काय घडलं?

Wari 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात उधळला बैल, वारकऱ्यांची धावपळ अन्… बघा काय घडलं?

| Updated on: Jun 24, 2025 | 6:35 PM

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या रथातील बैलांच्या जोडीतील एक बैल उधळल्याचे पाहायला मिळाले. यानंतर वारकऱ्यांची एकच धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात बैल उधळल्याचे पाहायला मिळाले. दोन दिवसांपूर्वी दिवे घाटात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात भाविक अन् वारकऱ्यांची गर्दी झाली होती. याच दरम्यान, हा बैल उधळला. त्यामुळे भाविक आणि वारकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आणि एकच धावपळ झाली. दिवे घाट सर करण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या रथाला चार ते पाच बैल जोड्या होत्या. यातील हा बैल असल्याचे सांगितले जातेय. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती आहे.

दरम्यान, आषाढी एकदशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेने निघते. आळंदीहून पालखी निघते तेव्हापासून माऊलीच्या पालखी रथा समोर माऊलीचे अश्व देखील चालत असतात. एका आश्वावर माऊली विराजमान होतात तर दुसऱ्या आश्वावर चोफदार विराजमान होतात. ज्या भाविकांना गर्दीमुळे माऊलीचे दर्शन मिळत नाही ते या माऊलीच्या आश्वाचे दर्शन घेतात असे सांगितले जाते.

Published on: Jun 24, 2025 06:35 PM