जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर 80 पर्यटकांना मधमाशांचा चावा
सर्व पर्यटक पुणे, भोसरी, खेड परिसरातील आहेत. अनेक जण किल्ल्यावर अडकले.अम्ब्युलन्समधून जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणून त्यांना उपचार घेऊन पुन्हा घरी सोडले आहे.
जुन्नर : किल्ले शिवनेरीवर जवळपास 80 पर्यटकांना आग्या मोहोळाच्या माशांनी चावा घेतला आहे. रविवार असल्याने किल्ल्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. मोहोळाला दगड मारल्याने माशा सैरभर झाल्याचा अंदाज आहे. सर्व पर्यटक पुणे, भोसरी, खेड परिसरातील आहेत. अनेक जण किल्ल्यावर अडकले.अम्ब्युलन्समधून जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणून त्यांना उपचार घेऊन पुन्हा घरी सोडले आहे.
Published on: Mar 13, 2022 08:57 PM
