Aurangabad | औरंगाबादमध्ये दोरखंडाला धरुन नदी पार करतानाचा व्हिडिओ व्हायरल

Aurangabad | औरंगाबादमध्ये दोरखंडाला धरुन नदी पार करतानाचा व्हिडिओ व्हायरल

| Edited By: | Updated on: Sep 22, 2021 | 10:44 AM

औरंगाबाद जिल्ह्यातील धनगर माळेगावला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून शेतात जाणे आणि येणे करावे लागत आहे. दोन्ही बाजूला नागरिक दोरखंड धरुन थांबतात आणि त्याचा आधार घेऊन अनेक शेतकरी, शेतमजूर आणि महिला ये जा करत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील धनगर माळेगावला जोडणारा पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून शेतात जाणे आणि येणे करावे लागत आहे. दोन्ही बाजूला नागरिक दोरखंड धरुन थांबतात आणि त्याचा आधार घेऊन अनेक शेतकरी, शेतमजूर आणि महिला ये जा करत आहेत. आशा परिस्थितीत मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोरखंडाला धरून नागरिक ये जा करत असल्याचा व्हिडीओ धक्कादायक समोर आला आहे.