Ajit Pawar : दादांचं भाषण सुरू अन् प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गदारोळ, पुण्यात नेमकं काय घडलं?

Ajit Pawar : दादांचं भाषण सुरू अन् प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गदारोळ, पुण्यात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 14, 2025 | 1:15 PM

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस असून पोटात अन्न नसल्यामुळे बच्चू कडू यांची प्रकृती खालवली आहे. यामुळे आंदोलन स्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झालंय. तर दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एक कार्यक्रम सुरु होता. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना प्रहार संघटनेचे कार्यकर्ते पोहचले आणि त्यांनी अजित दादांच्या कार्यक्रमात एकच गदारोळ घातला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना न्याय द्या, अशी घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला. या गोंधळादरम्यान, अजित पवार यांनी त्या कार्यकर्त्यांना शांत करत मुख्यमंत्र्यांनी काल अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना बच्चू कडू यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. फोनवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे बच्चू कडूंसोबत करुन दिले, असे सांगितले. तर राज्य सरकार बच्चू कडू यांच्या मागण्यांसाठी समिती गठीत करणार आहे. त्या समितीत बच्चू कडू यांनाही घेण्यात येईल. ती समिती सरकारला अहवाल देईल. त्यानंतर ज्या मागण्या मान्य करणे शक्य असतील त्या मागण्या मान्य होतील, असे अजित पवार म्हणाले.

Published on: Jun 14, 2025 01:11 PM