Bachchu Kadu : राज्यभरात शेतकरी आक्रमक, आता थेट नागपूर-हैदराबाद महामार्गावर हजारोंची गर्दी अन् चक्काजाम

Bachchu Kadu : राज्यभरात शेतकरी आक्रमक, आता थेट नागपूर-हैदराबाद महामार्गावर हजारोंची गर्दी अन् चक्काजाम

| Updated on: Oct 28, 2025 | 6:04 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी नागपुरात भव्य मोर्चा काढला आहे. हजारो शेतकऱ्यांसह नागपूर-हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर धडकणार असून, महादेव जानकर आणि रविकांत तुपकरही उपस्थित आहेत. रस्त्यावर ८ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात भव्य मोर्चा काढला आहे. अमरावती जिल्ह्यातून सुरू झालेला हा महाएल्गार मोर्चा सध्या जामठा परिसरात पोहोचला आहे. नागपूर-हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी चक्काजाम आंदोलन करत आहेत. यामुळे महामार्गावर ८ ते १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बच्चू कडू ट्रॅक्टरवरून मोर्चाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्यासोबत महादेव जानकर आणि रविकांत तुपकर हेदेखील उपस्थित आहेत. हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर धडकणार आहे. आंदोलकांनी रस्त्यावर बसून सातबारा कोरा करा अशी मागणी लावून धरली आहे.

Published on: Oct 28, 2025 06:04 PM