Balochistan Protest : पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा

Balochistan Protest : पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचला, आम्ही..; बलुचिस्तानची मोठी घोषणा

| Updated on: May 15, 2025 | 12:00 PM

Balochistan Protest Against Pakistan : बलुचिस्तानच्या आंदोलकांनी मोठी घोषणा केले आहे. मेहरंग बलोच यांच्या भाषणाच्या वेळी ही घोषणा करण्यात आली आहे.

भारताने पाकिस्तानच्या विरोधात पाऊल उचलावं, आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी मोठी घोषणा बलुचिस्तानच्या आंदोलकांनी केली आहे. मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून अशाप्रकारची घोषणाबाजी झाली.

स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत बलुच नागरिकांकडून पाकिस्तानच्या विरोधात जोरदार आंदोलने सुरू आहेत. बलुचिस्तानच्या आर्मीकडून देखील पाकिस्तानच्या लष्करावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. अशातच मेहरंग बलोच यांच्या भाषणाच्यावेळी देखील बलुचिस्तान भारतासोबत असल्याचं म्हणत पाकिस्तानविरोधात पाऊल उचलण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. मेहरंग बलोच यांचं भाषण सुरू असतानाच आंदोलकांनी ‘भारत कदम बढाओ, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली.

Published on: May 15, 2025 11:52 AM