Balraje Rajan Patil : अजितदादा मोठे नेते पण… बाळराजेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले, माझ्याकडून शब्द निघून गेले…

Balraje Rajan Patil : अजितदादा मोठे नेते पण… बाळराजेंकडून दिलगिरी व्यक्त; म्हणाले, माझ्याकडून शब्द निघून गेले…

| Updated on: Nov 19, 2025 | 2:47 PM

बाळराजे राजन पाटील यांनी अजित पवारांची दिलगिरी व्यक्त करत त्यांना मोठे नेते म्हटले आहे. सोलापूरच्या अनगर नगरपरिषदेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले.

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी सुरू आहेत. त्यातच बाळराजे राजन पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर दिलगिरी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही वक्तव्ये झाली होती. त्यावेळी राजन पाटील यांनी अजित पवारांना आव्हान दिल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर बाळराजे यांनी हे वक्तव्य भावनेच्या भरातून निघाल्याचे स्पष्ट केले. अजित पवार हे मोठे नेते असून, त्यांचे वडील त्यांच्यासोबत काम करत असल्याचेही बाळराजे यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांपासून काही मोजके कार्यकर्ते त्यांच्या कुटुंबावर, गावावर आणि परिसरावर खालच्या पातळीवर टीका करत होते. सहनशीलतेलाही अंत असतो. दोन दिवसांपासून गावावर होत असलेल्या टीकेमुळे एक कार्यकर्ता, नागरिक आणि तरुण म्हणून मला ते सहन झाले नाही. त्यामुळेच भावनेच्या भरातून ते शब्द बाहेर पडले, असे स्पष्टीकरण बाळराजे यांनी दिले आहे.

Published on: Nov 19, 2025 02:47 PM