Congress On Parth Pawar | तर काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावा, मला विश्वास आहे की…बारामती निवडणुकीवर फडणवीसांची साद; नेमकं काय होणार?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी निवडणुकीसंदर्भात ठाम भूमिका मांडताना, “उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही रोखता येत नाही. जशी वेळ येईल तसं सामोरं जावं लागतं. येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. पाठिंब्यासाठी कोणाला फोन करणार नाही,” असे स्पष्ट केले.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी निवडणुकीसंदर्भात ठाम भूमिका मांडताना, “उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून कोणालाही रोखता येत नाही. जशी वेळ येईल तसं सामोरं जावं लागतं. येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाऊ. पाठिंब्यासाठी कोणाला फोन करणार नाही,” असे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करत, “काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे,” असे विधान केले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली. काँग्रेसने पार्थ पवार यांच्यावर वैयक्तिक टीका करत, त्यांच्या वक्तव्याला आक्षेपार्ह असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, या वादावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, “काँग्रेस पक्षाला जनभावनेची जाणीव असेल आणि जनतेची नस ओळखता येत असेल, तर त्यांनी आपला उमेदवार मागे घ्यावा. मला विश्वास आहे की, काँग्रेसने तसे केल्यास सुनेत्रा पवार यांची निवड बिनविरोध होऊ शकते.”
या सर्व घडामोडींमुळे बारामती पोटनिवडणुकीत राजकीय वातावरण अधिकच तापले असून, आगामी काळात या वादाचा राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
