Suresh Dhas :  ‘माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून…’, खोक्या प्रकरणाचा उल्लेख करत धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Suresh Dhas : ‘माझ्या खुनाचा कट अन् मला व्हिलन ठरवून…’, खोक्या प्रकरणाचा उल्लेख करत धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट

| Updated on: Apr 01, 2025 | 10:45 AM

खोक्या उर्फ सतीश भोसले याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, त्याच्यावर अनेक आरोप झाले होते, त्याच्यावर शिकारीचा देखील आरोप लावण्यात आला होता. आणि जे मटण होतं, ते सुरेश धस यांना दिलं जात होतं, असाही आरोप झाला होता. आणि त्याच पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत एक गौप्यस्फोट केला आहे.

खोक्या भोसले प्रकरणात व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप बीडच्या आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले आहेत. राजस्थानातून बिश्नोई समाजाची काही लोकं मुंबईत आणली गेली आहेत. बिश्नोई समाजामध्ये मला व्हिलन ठरवायचं होतं असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे. ‘मला जिवंत मारण्याचा कट रचण्यात आला होता. बिश्नोई गँगला देखील बोलवण्यात आलं होतं’, असं सुरेश धसांनी म्हटलं असून त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरमयान, या कटामध्ये आणखी कोणत्या व्यक्त सहभागी आहे का, सुरेश धसांच्या मते, त्यांच्या जीवाला धोका आहे, तर त्यासंदर्भात त्यांनी गृहविभागाला काही कळवले आहे का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, खोक्या उर्फ सतीश भोसले या नावाच्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, त्याच्यावर अनेक गंभीर आरोप देखील झाले होते, यासह त्याच्यावर शिकारीचाही आरोप करण्यात आला होता.

Published on: Apr 01, 2025 10:45 AM