Mahadev Munde Case : पतीच्या हत्येला 21 महिने एकही अटक नाही, मुख्यमंत्र्यांना आज सगळं सांगणार, जीवंत आहे तोपर्यंत… ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?

Mahadev Munde Case : पतीच्या हत्येला 21 महिने एकही अटक नाही, मुख्यमंत्र्यांना आज सगळं सांगणार, जीवंत आहे तोपर्यंत… ज्ञानेश्वरी मुंडे काय म्हणाल्या?

| Updated on: Jul 31, 2025 | 11:06 AM

आज ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार असून, गेल्या 21 महिन्यांतील आपली व्यथा त्या त्यांच्यासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

बीड जिल्ह्यातील परळीतल्या तहसील कार्यालयासमोर 20 ऑक्टोबर 2023 ला महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक झालेली नाही. हत्येला 21 महिने लोटून देखील पोलिसांच्या हाती काहीही लागलेलं नाही. धक्कादायक म्हणजे याच 21 महिन्यात आठ तपास अधिकारी बदलले गेले. आरोपानुसार काहींच्या बदल्या करण्यात आल्या तर काहींना प्रमोशन देऊन दुसरीकडे पाठवले गेले. मात्र महादेव मुंडे यांच्या हत्येला 21 महिने उलटूनही अद्यापही आरोपी फरार असल्याचे दिसतंय.

अशातच ज्ञानेश्वरी मुंडे आज सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. पती महादेव मुंडे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे फडणवीसांची भेट घेणार असून मुख्यमंत्र्यांना भेटून यातना सांगणार असे त्यांनी म्हटले आहे. जीवंत आहे तोपर्यंत न्यायाचा लढा लढणार असेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांकडे नेमकी कोणती मागणी करणार आणि फडणवीस या प्रकरणात काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 31, 2025 11:06 AM