Beed Dowry Death : वैष्णवी हगवणेसारखाच बीडच्या गेवराईतही हुंडाबळी, लग्न झालं अन् 2 महिन्यातच….
बीड जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. लग्नाच्या फक्त दोन महिन्यांनंतर एका नवविवाहितेचा विहिरीत मृत्यू झाला. सासऱ्यांकडून हुंड्याच्या मागणीसाठी तिला त्रास दिला जात होता आणि माहेरीहून पैसे आणण्यासाठी दबाव आणण्यात आला होता. या घटनेनंतर सासऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे हे प्रकरण चांगलंच चर्चेत होतं. वैष्णवीने पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील बावधन येथे आपल्या सासरी आत्महत्या केली होती. त्यानंतर आवाज उठवल्यानंतरही राज्यात अशा घटना थांबतांना दिसत नाहीये. अशातच बीड जिल्ह्यातील गेवराई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर एका तरुणीचा विहिरीत मृत्यू झाल्याची बातमी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवविवाहितेला सासऱ्यांकडून हुंड्याच्या नावाखाली सतत त्रास दिला जात होता. सासरे माहेरीहून पैसे आणण्यासाठी तिला दबाव आणत होते. या छळामुळे तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हुंडाबळीच्या या प्रकाराने पुन्हा एकदा समाजाला विचार करण्यास भाग पाडले आहे.
