Beed : आजीचा अट्टहास अन् मृत घोषित केलेलं बाळ दफन करताना झालं जिवंत, बीडमध्ये धक्कादायक प्रकार

Beed : आजीचा अट्टहास अन् मृत घोषित केलेलं बाळ दफन करताना झालं जिवंत, बीडमध्ये धक्कादायक प्रकार

| Updated on: Jul 10, 2025 | 4:32 PM

बीडच्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयातील हा खळबळजनक प्रकार असून  या नवजात बाळावर स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं नवजात बाळ अचानक दफनविधी करताना जिवंत झालं आणि एकच खळबळ उडाली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये डॉक्टरांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अंबाजोगाई तालुक्यातील होळ येथील एका महिलेची 7 जुलै रोजी 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालयात प्रसूती झाली होती. यावेळी बाळाचा मृत्यू झाला असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. डॉक्टरांकडून आपले बाळ मृत असल्याची माहिती दिल्यानंतर प्रसूत झालेल्या महिलेने आणि तिच्या पतीनेही आपलं बाळ जिवंत असल्याची उमेद सोडून दिली होती आणि दफनविधीची तयारी केली. मात्र आजीने नवजाळ मृत घोषित केलेल्या बाळाचा चेहरा बघण्याचा अट्टहास केला आणि हा प्रकार उघडकीस आला.

Published on: Jul 10, 2025 04:30 PM