वाल्मिक आण्णा अंगार है, बाकी सब भंगार है…! बीडमध्ये कराडच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
बीडच्या मांजरसुंबा चौकात लक्ष्मण हक्के यांच्या समर्थकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली. यामुळे मराठा आणि ओबीसी समाजातील नागरिकांमध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला.
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौकात लक्ष्मण हक्के यांच्या समर्थकांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे मांजरसुंबा चौकात काही काळासाठी मराठा आणि ओबीसी समाजातील नागरिक आमनेसामने आले. हक्के यांच्या सभेला जात असलेले समर्थक कराडच्या समर्थनात घोषणा देत होते. वाल्मीक कराड यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानले जाते. आरोपींच्या समर्थनात झालेल्या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी काही काळ पोलिसांची उपस्थिती वाढवण्यात आली होती.
Published on: Sep 08, 2025 09:28 AM
