Bhagatsingh Koshyari letter : राज्यपालांचं मुख्य सचिवांना पत्र, कोट्यवधींच्या जीआरची विचारणा, राज्य सरकारच्या उत्तराकडं लक्ष

| Updated on: Jun 28, 2022 | 10:07 AM

राज्यपालांनी दरेकरांच्या पत्राची दखल घेतली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्याच्या मुख्य सचिवांना याविषयी पत्र लिहिलं आहे. सरकारकडून 3 दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे.

Follow us on

मुंबई : राज्यात चाललेला सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) पाहता अनेक घडोमोडी घडातायत. यातच आता एक मोठी बातमी समोर आलीय. सात दिवसांपासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर आहे. यातच महाविकास आघाडी सरकारनं मोठ्या प्रमाणात जीआर मंजूर केल्याचा माहिती आहे. यासंबंधीच्या बातम्या यापूर्वी देखील आल्या आहेत. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना (Bhagatsingh Koshyari) पत्र लिहून जीआर यासंदर्भात निदर्शनास आणून दिलं होतं. राज्यपालांनी दरेकरांच्या पत्राची दखल घेतली असून याबाबत मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्याच्या मुख्य सचिवांना याविषयी पत्र लिहिलं आहे. सरकारकडून 3 दिवसात मंजूर झालेल्या जीआरची माहिती राज्यपालांनी मागवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.