Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांसाठी पक्षातले बडवे कोण? रोख नेमका कुणावर? ठाकरेंचे 2 मोठे नेते नाराज
संजय राऊतांच्या वक्तव्यावर देखील भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र पक्षातील बडवे म्हणजे विनायक राऊत आहेत का? असा सवाल सध्या चर्चेत आहे.
दोन दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी आपली खदखद व्यक्त केली असल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर भास्कर जाधव ठाकरेंच्या सेनेत नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, पक्षातले बडवे असा उल्लेख भास्कर जाधवांकडून करण्यात आला होता. भास्कर जाधव यांचा रोख नेमका कुणावर आहे? भास्कर जाधव यांची नाराजी विनायक राऊतांवर आहे का? असा प्रश्न आता विचारला जातोय. विनायक राऊत हे पहिल्या फळीतले नेते आहेत. शिवसेना ठाकरे गटामध्ये विनायक राऊत हे मोठ्या, पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये असल्याचे मानलं जातं. तर पहिल्या फळीतल्या नेत्यांवर नाराज असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलंय म्हणजे त्यांचा रोख हा राऊतांवर असल्याचे बोलले जात आहे. कोकणामध्ये विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यामध्ये आतर्गंत संघर्ष आहे. दोघांमधला संघर्ष अनेकदा उघड देखील झाला होता.
Published on: Jun 24, 2025 02:13 PM
