Bhaskar Jadhav | विधानसभा अध्यक्ष पद मिळालं तर त्याचा आनंदच – भास्कर जाधव

Bhaskar Jadhav | विधानसभा अध्यक्ष पद मिळालं तर त्याचा आनंदच – भास्कर जाधव

| Edited By: | Updated on: Jul 10, 2021 | 1:55 PM

शिवसेनेकडे (Shivsena) असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पद मिळाले तर त्याचा मला आनंद असेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी घेतली आहे.

शिवसेनेकडे (Shivsena) असलेले मंत्रीपद शिवसेनेकडे राहून मला विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) पद मिळाले तर त्याचा मला आनंद असेल, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी घेतली आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी शिवसेनेनी आपल्या कोट्यातील मंत्रीपदाचा बळी देवू नये. असं ते म्हणाले., टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी रोखठोक उत्तरं दिली.

अध्यक्षपद मिळाला तर आनंद आहे पण…

अध्यक्षपद मिळाला तर आनंद आहे पण जर नाही संधी मिळाली, सभागृहात खाली बसायला दिलं तरी मी विरोधकांचा सभागृहातून नक्कीच सामना करेन, असंही भास्कर जाधव म्हणाले. यातून त्यांचा रोख वनखात्याकडे होता. एकंदरित वनखाते भूषविण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवलं.