Chandrakant Patil | उद्धवजी, लोण्याचा गोळा कोण मटकावतंय तुमच्या लक्षात आलंय का ? – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil | उद्धवजी, लोण्याचा गोळा कोण मटकावतंय तुमच्या लक्षात आलंय का ? – चंद्रकांत पाटील

| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 11:17 AM

महाराष्ट्रातील झेडपी पोटनिवडणूक निकालानंतर अतिशय बोलकी फेसबुक पोस्ट लिहित भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.

लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, उद्धवजी सुज्ञ आहेत!

आमचा एकेकाळचा मित्रपक्ष शिवसेना जि.प. निवडणुकीत तिसऱ्या स्थानी गेल्याचं स्पष्ट झालंय. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्या पक्षावर ही वेळ यावी? लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, हे आता त्यांच्या लक्षात आलं असावं, असं सांगताना महाविकास आघाडीत शिवसेनेचं नुकसान होतंय, असंच एकप्रकारे चंद्रकांत पाटील यांना सांगायचंय. त्याच्याही पुढे जाऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस लोण्याचा गोळा मटकावतंय, असं सांगण्याचा चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केलाय. तसंच उद्धव ठाकरे जनभावना लक्षात घेण्याइतके सुज्ञ नक्कीच आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.