भाजपने रणशिंग फुंकलं! मनपा निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला

भाजपने रणशिंग फुंकलं! मनपा निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरला

| Updated on: Jul 22, 2025 | 12:21 PM

महापालिका निवडणुकांसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला ठरला असून आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिका निवडणुकांसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक आमदाराची पाच कामं केली जाणार आहेत. महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजपने ही रणनीती आखली आहे. तर मुंबईत महायुतीचाच महापौर असेल असा निर्धार करायचा आहे. तसंच माध्यमांशी जास्त बोलू नका अशी ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.

मनपा निवडणुकीसाठी आता भाजपचा नवा फॉर्म्युला समोर आला असून यात प्रत्येक आमदाराची 5 कामे केली जाणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आता तयार झाली आहे. मनपा निवडणुकीत फायदा होईल अशी कामं आमदारांनी सुचवावी असे आदेश देण्यात आल्यानंतर आता आमदारांकडून कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयात देण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत आमदारांची मतं देखील जाणून घेण्यात आलेली आहे. मुंबईसह राज्यात सर्वत्र महायुती म्हणून लढायचं आहे, असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

Published on: Jul 22, 2025 12:21 PM