Atul Bhatkhalkar | अजब सरकारचा गजब कारभार अजून सुरुच आहे, भातखळकरांचा निशाणा
राष्ट्रगीताचा अवमान करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा

Atul Bhatkhalkar | अजब सरकारचा गजब कारभार अजून सुरुच आहे, भातखळकरांचा निशाणा

| Edited By: | Updated on: Aug 03, 2021 | 5:33 PM

लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद. लोकल ट्रेनबाबत अजून निर्णय होत नाही, आता मात्र भाजप याविरोधात आंदोलन करणार, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला.

मुंबई : अजब सरकारचा गजब कारभार अजून सुरूच आहे. कोणते निर्बंध कसे उठवायचे याचा काही अभ्यास नाही. लहरी राजाचा लहरी कारभार, बार उघडे मंदीर बंद. लोकल ट्रेनबाबत अजून निर्णय होत नाही, आता मात्र भाजप याविरोधात आंदोलन करणार, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला. निर्बंधांबद्दलच धोरण नेमकं कोणत्या आधारावर आहे तेच कळत नाही. धोरण नसलेलं हे सरकार आहे. मंदिर उघडण्याबद्दल नेमकं अडचण आहे, पहिल्यापासून यावर राग का ? मंदिर हे सामाजिक आणि आर्थिक चलनाच केंद्र, अनेकांचा रोजगार यावर अवलंबून आहे. 10 वाजेपर्यंत हॅाटेल उघडले तर मग मंदिर उघडायला अडचण काय ? असा सवालही भातखळकर यांनी सरकारला केला आहे.