Kirit Somaiya | अनिल देशमुख चौकशीला का घाबरतात? : किरीट सोमय्या

Kirit Somaiya | अनिल देशमुख चौकशीला का घाबरतात? : किरीट सोमय्या

| Edited By: | Updated on: Aug 29, 2021 | 8:35 PM

अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. 18 ऑगस्ट हे पाचवं समन्स होतं. 16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.

मुंबई : अनिल देशमुख पळून गेले. हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टाने आनिल देशमुख यांच्या याचिका फेटाळल्या. अनिल देशमुख चौकशीला का घाबरतात? असा सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. अनिल देशमुख यांना ईडीने आतापर्यंत 5 समन्स बजावले आहेत. त्यात पहिलं समन्स 25 जून रोजी देऊन 26 जून रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं. दुसरं समन्स तात्काळ 26 जून रोजी देऊन आठवड्याभरात म्हणजे 3 जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. तिसरं समन्स बजावल्यानंतर 5 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तर चौथं समन्स 30 जुलै रोजी पाठवून 2 ऑगस्ट रोजी हजर राहण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यानंतर 18 ऑगस्ट हे पाचवं समन्स होतं. 16 ऑगस्ट रोजी समन्स पाठवून त्यांना 18 ऑगस्टला हजर राहण्यासाठी सांगितलं गेलं होतं. मात्र, देशमुख चौकशीसाठी गेले नाहीत. त्यांनी त्यांचे वकील इंदरपाल सिंग यांना निवेदन घेऊन पाठवलं होतं.